मन - 8 - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

17 दिसंबर 2016

मन - 8

part -8
आधीच सांगितल्याप्रमाणे आपण एक नसुन दोन आहोत.... अस जर असेल तर प्रत्येकालाच दोन नाव आपण ठरवायला पाहिजे त्यापैकि जो चांगला आहे फक्त त्याच्याशी संबंध ठेवायचे अन जो वाईट आहे त्याला ignore करणच योग्य राहिल...
उदा. माझी एक मैत्रीण आहे xxx नावाची खुप राग येतो मला तिचा पण प्रामाणिक पणे सांगायच झाल तर तिचा स्वभाव खुप छान आहे... त्यामुळे तिच दुसर एक नाव ठेवलय मी " अंजली "... आजकाल मी फक्त अंजलीशी बोलत असतो त्यामुळे xxx चा राग कमी झाला आहे.
असच एक गोष्ट आठवली....
एका माणसाला एक नाटक बसवायच असतं... त्यासाठी प्रभू श्री राम यांच्या भूमिकेसाठी एक गोड दिसणारा मुलगा त्यांना हवा असतो... त्यासाठी ते एका शाळेत जातात खुप जणांना पाहिल्यावर एका मुलाची निवड करतात... शेवटी नाटक पूर्ण होतो त्या बालकलाकाराचे खुप कौतुक होतं...
अनेक वर्षानी त्याच व्यक्तीला तेच नाटक पुन्हा करायच असत तेव्हा रावणाच्या भुमिकेसाठी एखादा व्यक्ती शोधायला एका तुरुंगात जातात आणि एका निर्दयी दिसणाऱ्या व्यक्तीची निवड करतात... 
तेव्हा तो कैदी ढसाढसा रडू लागतो, कारण विचारल्यावर तो म्हणतो कि मी तोच आहे जो लहानपणी तुमच्या नाटकात बाल श्रीरामांची भूमिका केली होती...
म्हणजे राम आणि रावण दोघेही आपल्यातच असतात.... ईश्वर आपल्याला जन्म देताना कस निरागस बनवून पाठवत असतो... ( म्हणूनच कदाचीत लहान मुलात देव असतो अस म्हणतात ) आणि आयुष्यभर आपण आपल्यातला रावण वाढवत बसतो... ( ते कस हे माहीत असेलच )
आपल्यातल्या रामाला वाढवण हेच जिवणाच ध्येय असाव बहुतेक
आपल्यातला जो वरचढ तशी आपली वृत्ती बनते समोरच्याशी आपले संबंध कसे आहेत त्यावर आपल्यातला एक जण जागा होत असतो... ते ठिक आहे पण जेंव्हा आपल्या स्वताचा प्रश्न येतो तेंव्हा गडबड होते... दोघेही जागृक होतात ५०-५० अन आपण निर्णय घेण्यास असमर्थ ठरतो...
क्रमशः....

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें