स्वप्न आणि वास्तव
एक स्वप्न झरुन गेलेले
एक स्वप्न विरुन गेलेले
एक स्वप्न घडून गेलेले
एक स्वप्न विसरुन गेलेले
स्वप्न एक भास
की जगणं एक भास,
स्वप्नांच्या दुनियेतही का असावा
वास्तवाचा आभास.
स्वप्न वाटते वास्तव
वास्तव वाटावे स्वप्न
स्वप्न पडते घडून गेलेले, की
स्वप्न असतात फक्त मनाचे खेळ,
स्वप्नांचा आणि वास्तवाचा
कधीच बसत नाही मेळ.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें