स्वार्थ या मनाचा
साधणार मी कधी...
तुला मनातलं सारं
सांगणार मी कधी..
उपकार न कुणाचे,
असे हक्क तो माझा..
माझच आहे सर्वस्वी,
मिळणार ते कधी.
कोड्यात मन हे माझ
पण ओढ अंतरीची ...
तुला कधी न कळली
साद या मनाची ...
संपणार सारेच जणू सोबतीच माझ्या...
अपेक्षांची चिता मग जळणार ती कधी...
--नंद किशोर...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें