तुला पाहतो मी
तुला पाहतो मी
पहाटेच्या कोवळ्या किरणांत,
धरतीला न्हाऊ घालणाया
पावसाच्या धारांत
तुला पाहतो मी
मोहक दरवळणाया सुगंधात,
राना-वनातून मुक्तपणे वाहणाया
स्वच्छंद वायात
तुला पाहतो मी
समुद्राच्या अजस्त्र लाटांत,
शांत, निर्मळ नदीत उठणाया
संथ जलतरंगात
तुला पाहतो मी
नदीकाठी ध्यानस्थ असणाया
पात्रात पाय डुंबवलेल्या
अवखळ प्रचंड वृक्षात
तुला पाहतो मी
किलबिल करणाया
पक्षांच्या गुंजारवात,
पडणाया प्रत्येक गुलाबी स्वप्नांत
जीवनाच्या मधुर स्मृतीत
फक्त तुला पाहतो मी.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें