दयाघना... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

गुरुवार

दयाघना...

दयाघना

देवा, तुझ्या दरबारात
मी उभा शांतपणे, निस्तब्ध
तुझ्यासमोर कसं बोलावं
हेच समजत नव्हतं, तेव्हा
माझं अंतर्मन तुझ्याशी
संवाद साधू लागलं.

माझं अंतर्मन तुला सांगू लागलं की
मी पुण्य कमी, चुका जास्त केल्या,
हे सांगतांना अंतर्मन थरथरत होतं
वाटलं, तुला खूप राग येईल
आणि मला शिक्षा करशील 
पण ... 

तू प्रेमळपणे पाहिलंस आणि म्हणालास
मी तुला माफ केलं,

आश्चर्याने चमकून मी तुझ्याकडे पाहिलं,
माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून तु म्हणालास
अरे, लोक विशिष्ट कारणं डोळ्यासमोर ठेवून
पुण्य करत असतात,
पण तुझ्याकडून इतरांना त्रास होऊ नये 
याचा नेहमीच तू प्रयत्न करतोस
हेच तुझं पुण्य,

उरला प्रश्न तुझ्या चुकांबद्दल
तुझ्या हातून चुका घडतानाही
तुझं मन निरागस होतं,
तसं पाहिलं तर आता
पहिला दगड मारण्याचा
अधिकार असलेली निष्पाप माणसे
आता कमी झाली आहेत.

तुझे आश्वासक शब्द ऐकून
माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले
आणि त्यातच माझं दु:खही वाहून गेलं,
खरंच देवा, तु किती दयाळू आहेस,
तुझं समजून घेणं
अगदी सागराहूनही विशाल.

बाळ रडू लागलं की
आई त्याला दूध पाजते
पण...
बाळाचं रडणं थांबावं म्हणून
आईमध्येच दूध निर्माण करणा­या देवा,
तुझं प्रेम अगदी एकमेवाद्वितीय...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें