निर्वासितांच्या आयुष्यावरचे अनेक चित्रपट अनेक देशांमध्ये आले. त्यातलाच एक चित्रपट हाँगकाँग मधला 'शिंजुकू इंसिडेंट'.
आपल्या निर्वासित मैत्रिणीला भेटण्यासाठी चीन मधुन जपानला गेलेला पुर्वाश्रमीचा ट्रॅक्टर मेकॅनिक नायक आणि त्याच्याबरोबर घडलेले प्रसंग ह्या भोवती सगळा चित्रपट आहे. एका पोलिसाची समुद्र तटावरती हत्या करुन हे निर्वासितांच टोळकं जपानमध्ये प्रवेश करतं. त्यामध्ये नायकही असतो. हातात पडेल ते काम करुन एकदाच मैत्रिणीला भेटायचं असा विचार करुन कचरा साफ करण्याचं काम करत असताना अचानक त्या ठिकाणी पोलिसांची धाड पडते. जो तो वाट दिसेल तिकडे पळत सुटतो. भुयारी गटरातुन पळून जाताना नायक त्यांचा पिच्छा करण्याच्या नादात गटारात वाहून जाणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा जीव वाचवतो जो चित्रपटाच्या मध्यात व शेवटी त्याची मदत कराण्याचा प्रयत्न करतो. मैत्रीणीला तिथल्याच कुख्यात गुंडाच्या बायकोच्या रुपात बघून मात्र नायक निराश होउन अवैधरीत्या पैसे कमाउन तिथलेच कागदपत्र काढण्याचा विचार करतो. याचदरम्यान त्याचा सहकारी तिथल्या माफिया टोळीच्या हाती लागतो व त्यात त्याचा गमावतो.त्याचा बदला घेण्यासाठी व तिथलाच एक माफिया बनण्यासाठी व नंतर त्याच्यावर उलटलेले त्याचे सहकारी. या सगळ्यामध्ये नायक जे काही करतो त्यासाठी चित्रपट पहायला हरकत नाही.
चित्रपटाचं आणखी एक वैशिष्टय असं की ऍक्शन व/वा कॉमेडी चित्रपटाचा बादशहा जॅकी चैन हा या क्राईम ड्रामा जेनरच्या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत आहे.
IMDb रेटिंग: ७.१/१०
टीप: तुम्हाला हिंदी dubbed version हवे असल्यास प्रतिसादात ई-मेल टाका. कार्यस्थळी ब्लॉगस्पॉट गंडलेलं असल्या कारणानं जेंव्हा घरी जाईल आणि मूड असेल तेंव्हा नक्कीच लिंक ई-मेल करेल.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें