प्रेम...
तू एका ठराविक साच्यातील
नव्हतीसच कधी,
तुला पाहिजे होतं
फक्त नि:स्वार्थ प्रेम.
खूप आटापिटा केलास
सर्व मर्यादा ओलांडल्यास त्यासाठीच,
एवढं सर्व करुनही
वाटतं तुला एकाकीच.
निराश होऊन तू विचार करतेस
हे माझ्यासोबतच असं का व्हावं?
पण तुला हे नाही कळलं की
खरं प्रेम कोणालाच भेटलं नाही.
खूप थकून एकटीच
रडत होतीस जेव्हा
तुझ्या ह्मदयातील मीदेखील
तुझ्यासोबत रडत होतो.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें