तर साल २०१० मध्ये झटून झटून आपकमाई नं दुचाकी घेतलीच. ही एक लंबी कहाणी हय, पुन्हा कधीतरी...
प्रत्येकाची गाडी चालवायची पद्धत आणि सवय वेगळी असते. मला गाडीच्या आरश्यात मागच्या गाड्या बघून चालवायची सवय आहे. परवा नेहमी प्रमाणे कॉलेजच्या पार्किंग मधून गाडी काढली अन निघालो. नेहमी सारखंच आरश्यांचे थोबाडं तिसरीकडं होते. अंदाजपंचे ऍडजस्ट करून निघालो. भलेमोट्ठे अन भरपूर खड्डे असलेल्या आमच्या पैठण रोडवरून जाताना एक खड्डा आलाच अडचणीवाला. बर आरश्यात बघायला गेलो तर त्याचं थोबाड वर, गाडीचा आवाज येत होता पण किती दूर आहे ते समजाना. त्या चक्कर मध्ये मध्ये गाडी रोडखाली आली.
एखाद्या दिवशी ठीक आहे पण रोजरोज काय कटकट है राव.
गोष्ट छोटीच आहे पण आपलं थोबाड बघायला जे दुसऱ्यांच्या गाड्याचे आरसे फिरवून ठेवतात त्यांचा मला खूप राग येतो.
I Hate You घुबड तोंडांच्यानो जे पुन्हा दुसऱ्यांच्या गाडीचे आपले तोंड पाहायला वापरलेले आरसे undo करत नाहीत.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें