प्रवास...फिरणं...बोंबलत फिरणं...
मला प्रवास करायला खुप आवडतं. प्रवासाच्या माझ्या स्वतःच्याच काही ढोबळ व्याख्या आहेत. कामासाठी प्रवास म्हणजे प्रवास. पर्यटन वैगेरे साठी प्रवास म्हणजे फिरणं. टवाळक्या करत फिरणं किंवा रिकाम्या कामांसाठी भटकणं म्हजे बोंबलत फिरणं.
प्रवासात काही गोष्टी मला बघायला फार आवडतात. दुचाकी वरुन फिरताना महामंडळाची बस तिरपी-तिरपी चालताना अंगावर आल्यागत भासते. कारमधून फिरताना सरळ रस्त्यावरही काहीवेळेस असे चढ येतात की त्यानंतर कार आता उडी मारणार असं वाटतं. बस मध्ये बसून फिरताना आपली बस दुसऱ्या बसला ओव्हरटेक करुन गेल्यावर कोण आनंद होतो अन् दुसरी बस आपल्या बसला ओव्हरटेक केल्यावर काय गाडी चलवायलाय, आता बैलगाडी पण आपल्याला ओव्हरटेक करेल असं वाटतं. ट्रेन मधून फिरताना भिकारी वैताग देतात पण त्यापेक्षा जास्त वैताग तृतियपंथी देतात.
दुचाकी सोडून दुसऱ्या वाहनांत फिरताना मला खिडकीजवळची जागा फार आवडते. पण भरभर कानात शिरणाऱ्या वाऱ्याने डोकं उठतं त्यामुळे शक्यतो मी खिडकी बंदच ठेवतो. बसची खिडकी जर माझ्या व पुढच्या वा मागच्या सिटमध्ये कॉमन असेल व त्याने/तिने त्याच्याकडच्या खिडकीसाठी जास्त जागा मारली तर मी सगळी खिडकी त्याच्याबाजूला सगळी मोकळी करुन देतो. एशियाड मध्ये तर एक अस्पष्ट अशी स्पर्धा असते सिटच्या दांड्यावर हात ठेवण्याची ज्याने आधी ठेवला त्याने ठेवला. मला कधीच बस लागत नाही पण बसमधल्या कुणाला लागली तर उगीचच मळमळ व्हायला होतं. मला कधीच बस/कार/ट्रेन मध्ये झोप येत नाही मग कितीही मोठा प्रवास असो. रात्री बसमध्ये ढाराढूर झोपणाऱ्यांचा मला हेवा वाटतो मग. बसमध्ये उगीचच मोबाईलवर मोठ्याने बोलणाऱ्याचा मोबाईल आदळ्यासरशी खिडकीतून बाहेर पडावा अशी माझी मनोमन खूप इच्छा असते. सनासुदिच्या काळात रुमाल टाकून जागा पकडणारे जर मला जागा मिळाली नाही तर खुप डोक्यात जातात. मग मी सरळ एक छान जागा बघून तिथल्या रुमालाने सिट चकाचक पुसून बसतो आणि भांडायच्या फुल्ल मूडमध्ये येतो. जिथून रुमाल टाकलास तिथून ये मग जागा सोडतो वैगेरे गोळ्या देउन कब्जा करतो. शिवनेरी मधून प्रवास करणं मला खूपच कंटाळवाणं वाटतं. कुणी कुणाला बोलत नाही, आदळे बसत नाहित आणि मी सोडून सगळे हूच्चभूभू सारखे भासायला चालू होतात. बसमध्ये बायकोचा फोन आल्यावर व लवकर या असं फर्मान असल्यावर प्रत्येक स्टॉपवर जसजशी पुढच्या सिटवर जागा होत जाईल तसतसा मी पुढच्या सिटवर जाउन बसतो आणि लवकर पोहोचण्यासाठी माझ्याच्याने होणारा तेवढाच एक प्रामाणिक प्रयत्न करतो. बसमध्ये प्रवास करताना हेडफोन वर गाणे ऐकण्यासारखं दुसरं सुख नाही असं मला वाटतं. एकदा प्रवासात ब्लुटूथ हेडसेट डिस्चार्ज झाल्यामुळं मी वायर्ड हेडफोनलाच प्राधान्य देतो.
प्रवासात मला खुप कल्पना सुचत राहतात इतक्या की गाडी स्पीड व विचारांची स्पीड ह्यांच सिंक्रोनायझेशन कसं बरं मोजावं असा विचार येतो.
कार/जीप मध्ये प्रवास हा शक्यतो सहकुटूंबच असतो. माझ्या आवडीचे गाणे असलेला पेनड्राईव्ह न चुकता घेतलेला असतो. मला झोप न लागण्याच्या सवयीमुळे रात्री माझी रवानगी समोरच्या सिटवर गाडी चालकाबरोबर गप्पा मरायला असते.
मित्रांबरोबर दुचाकीवर दूरवर फिरताना शक्यतो मीच गाडी चालवण्याचा हट्ट करतो कारणं मागच्या सिटवर बसून ढोपराला मुंग्या येउन बधीरता आल्यागत वाटतं. मी माझ्या दुचाकीचे ०००० पासून ते ००२१,०१००, ७००, ७८६, १०००, ११११, २००० इ.इ. जवळपास मला टिपिकल वाटणाऱ्या सर्व रिडींगचे फोटो काढून जतन करून ठेवले आहेत व अजूनही चालू आहे. मी गेले आठ वर्ष म्हणजे दुचाकी घेतल्यापासून दोन्ही हात सोडून गाडी चालवता येते का ह्याची चाचपणी करतो पण दोन-तीन सेकंदाच्यावर अजूनही मला ते जमलेले नाही. समोरचा दुचाकीस्वार मान तिरपी करुन मोबाईलवर बोलत चाललेला असला की मी तो किर्रर्र होइपर्यंत हॉर्न वाजवत रहातो.
बस/कार/दुचाकी प्रवासात गाडी पंक्चर होणे, पेट्रोल संपणे, गाडी बंद पडणे रात्रीच्यावेळी अप्पर मारुन चालणे व ट्रेनच्या प्रवासात मोठ्ठीच क्रॉसिंग असणे ह्या गोष्टींचा मला फार्फार राग येतो.
कधीकधी सुट्टीच्या दिवशी कुठं जायचं हे निश्चीत नसताना गाडीवर टांग मारुन भटकत फिरणं मला खुप आवडतं. एकंदरीत मला कुठलाही प्रवास करायला खूप आवडतं.
14 नवंबर 2017
New
प्रवास...फिरणं...बोंबलत फिरणं...
About Noob
SoraTemplates is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of SoraTemplates is to provide the best quality blogger templates.
साला मीच का???
Labels:
माझ स्वतःच लिहिलेलं काही…,
साला मीच का???
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें