समीक्षा-काउंट अॉफ माँटेक्रिस्टो-The Count of Monte Cristo - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

14 नवंबर 2017

समीक्षा-काउंट अॉफ माँटेक्रिस्टो-The Count of Monte Cristo

सक्काळ सक्काळ ही मुंबईतल्या बँक अॉफ बडोदावरच्या लुटीची (https://m.timesofindia.com/city/mumbai/gang-digs-40-ft-tunnel-under-3-shops-robs-bank-of-rs-1-5-crore/articleshow/61635827.cms) बातमी वाचली अन् द काउंट अॉफ माँटेक्रिस्टो चित्रपटाची बेदम आठवण आली. तसं पाहिलं तर बोगदा खणून चोऱ्या करणं जेलातून पोबारा करणं ह्या थीमेवर कैक हिंदी, अहिंदी चित्रपट आले, काही गाजलेही. पण त्यातल्यात्यात मला हाच चित्रपट आवडलेला.
दोन खलाशी मित्र आणि एक मैत्रिण असा प्रेमाचा त्रिकोण असलेलं  चित्रपटाचं कथानक नेपोलियन बोनापार्टच्या काळात रंगवलेलं/भासवलेलं आहे. अर्थातच प्रेमाचा त्रिकोण असल्याने हा सूडपटही आहे.
दोन मित्रांपैकी एका मित्रावर नायिकेचं आणि नायिकेवर दोघां मित्रांच प्रेम असतं. नायिकेचं प्रेम असणारा मित्र आणि नायिका त्याला खलाशावरुन कॅप्टनचं प्रमोशन भेटल्यावर लग्न करणार असतात पण दुसरा मित्र मात्र जळकुटा, कबाब में हड्डी टैप असतो. एवढंच नाही तर तो या आकसापोटी त्याला एका प्रकरणात गोवून त्याला एका खंदकवजा जेलात पोहचवतो आणि तो मेला असं जाहिर करुन नायिकेबरोबर लग्न करुन घेतो.
इकडं जेलातला मित्रं कायै हे म्हणून त्रागा करुन कसेबसे साहेक वर्ष कंठल्यावर स्वतःचाच खात्मा करण्याच्या बेतात असताना त्याच्या सेलातली एक फरशी उचकते, आणखी उचकते, आणखी...अन् त्याच्याखालून एक म्हातारबुवा प्रकटतात. तो म्हतारा पळून जायच्या चक्करमध्ये बोगदा खणत खणत बाहेर जायचा रस्ता चुकून त्याच्या सेलात पोहचतो. मरायचं सोडून है क्या यह म्हणत चौकशीअंती तो म्हताराही कैक वर्षांपासून इथलाच रैवाशी असल्याचं कळल्यावर व बऱ्याच हो नै हो नै नंतर हा पण त्याला मदत करायला राजी होतो. एक दिवस बोगदा खणताना तो अंगावर कोसळून म्हातारा गंभीर जखमी होतो पण मरायच्या आधी एका खजिन्याचा नकाशा त्याला सोपवून देतो.
नायक तिथून एकटा पडलेला असतानाही कसा सुटतो?
त्याला खजिना भेटतो का?
त्याच्या दगाबाज, जळकुट्या मित्राचा सूड घेतो का?
हे सगळे प्रश्न अनुत्तरीत सोडून अगदिच वेळ असेल तर (कारण चित्रपट चांगला दोन-सव्वादोन तासांचा आहे) हा चित्रपट अवश्य पहा असा फुकटचा सल्ला देतो.

अवांतर: जेल तोडून पळण्याच्या थीमांवरचा महा स्लो पण ट्विस्टींग शेवट असणारा आणखी एक चित्रपट, The Shawshank Redemption, पण त्याबद्दल नंतर कधितरी, निवांत...

IMDb Rating: 7.7/10

टीप: तुम्हाला हिंदी dubbed version हवे असल्यास प्रतिसादात ई-मेल टाका. कार्यस्थळी  ब्लॉगस्पॉट गंडलेलं असल्या कारणानं जेंव्हा घरी जाईल आणि मूड असेल तेंव्हा नक्कीच लिंक ई-मेल करेल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें