एक फूल
एका सायंकाळी
बागेत फिरताना,
पाहिलं एक फूल
सुंदर निरागस सुवासिक.
जन्म- जन्मांतरीचे नाते
मनात जुळून आले,
ऋणानुबंधाच्या धाग्याने
फुलाला जवळ करावे वाटले.
पण लक्षातच आलं नाही
की ते फूल माझ्यासाठी नव्हतं,
दुसयाचं नशीब फुलवणारं ते फूल
आपलंच का वाटत होतं?
मी विचारलं देवाला
हे असं काय व्हावं?
जे फूल मनाला भावलं
ते नशिबी का नसावं?
देव मला म्हणाला
अरे वेड¬ा,
दुसयाची अमानत ते फूल
तुला कसे रे मिळणार?
आणि त्याच रात्री स्वप्न पाहिलं
आपल्या दारातल्या वेलीवर
झुलावं वाटणारं फूल
दुसयाच्या वेलीवर झुलत असलेलं.
तेव्हा ठरवलं
विसरून जायचं त्या फूलाला,
पण कसं काढू
ह्मदयात घर केलेल्या सुवासाला?
पण तरीही तेव्हापासून सोडलं,
त्या फूलाचं स्वप्न पाहणं,
आणि त्या फूलासाठी
प्रीतीचं गीत म्हणणं.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें