समजा जर बंद पडलं घड्याळ माझ....
अस समझू नका कि, मी आता या जगात नाहिये...
तेंव्हाच खरतर (कदचीत) जगु लागेन मीही
सर्व बंधनांपलीकडे जाऊन...
घेईन एक मोकळा श्वास dead line च्या या गर्दीतही.
तेंव्हाच वेळेत काम पुर्ण होईल माझं...
नाहीतर असही कार्यपध्दतीपेक्षा busy schedule चाच धसका घेतलाय मी...
समजा जर बंद पडलं घड्याळ माझ....
तर भरुन काढीन साऱ्याच खाचा ज्या घड्याळाच्या टिकटिकि मधे सुटुन गेल्या...
देईन वेळ त्या नात्यांनाही ज्या तुटता तुटता राहुन गेल्या..
थांबेल कदाचीत हुरहुर एकदाची....
ठरवता येईल priority... कि मला जगायचंय कि जिवंत रहायचंय......
समजा जर बंद पडलं घड्याळ माझ....
-- नंदकिशोर...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें