मन -3 - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

23 नवंबर 2016

मन -3

मनाला स्थळ-काळाची बंधने नाहीत, कुठल्याही वेळी तो कोठेही जाऊ शकतो. प्रत्येकाने प्रामाणिकपणे निरीक्षण केल्यास असं लक्षात येईल कि बहुतेक वेळा मन हे एक तर भूतकाळात असत किंवा भविष्यकाळात पण शरीर आणि बुद्धी यांना हि मोकळीक नाही. यामुळं होत काय कि खूप कमी वेळ आपण जिवंत असतो. 
शाळा - कॉलेजला असताना बहुतेक वेळा हाच विचार करायचो कि हे सगळं संपल्यावर काय करायचं. अन आता ऑफिस मध्ये बसून तेंव्हा काय काय करामती केल्या याचे sessions  होतात, म्हणजे तेंव्हा मी कॉलेज मध्ये नसायचो अन आता ऑफिस मध्ये नाही. 

 " मोठेपणी तुला काय व्हायचं आहे.... ???? याप्रश्नाला एक ऐतिहासिक महत्व आहे. याचा नेमका उगमकाळ जरी सांगता नाही आला तरी मला जेव्हापासून कळतंय तेंव्हापासून तो प्रश्न अजूनही अस्तित्वात आहे. त्याशेबड्या पोराला काय काळत असलं बरं मोठेपणी काय व्हायला पाहिजे, (याप्रश्नामुळेचे बहुतेक त्या निरागस मनात भविष्यकाळ घुसडला जात असावा )बर विचारतेत  ते ठीक आहे. पण खरंच त्याच्या मनासारखं करून देतात का...? 

(भूतकाळ:  स्थळ दयानंद कॉलेज सोलापूर एकदा कसल्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हा ११ वी च्या मुलांना bsc (physics) च्या विद्यार्थ्यांनी बनविलेले प्रोजेक्ट दाखवायला घेऊन गेले होते ते सगळं पाहून पहिल्यांदा मनात असा विचार आला होता बस आपल्याला हेच करायचं आहे. आधी BSc  मग MSc. आन आता करतोय काय lecturer in engineering diploma. मला doctor व्हायचं आहे असं उत्तर दिल होत तेही कुठे नाही अन तो प्रश्न विचारणारे प्राणीही गायब आहेत)

क्रमशः 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें