मन - ५ - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

23 नवंबर 2016

मन - ५

थेअरी खूप झाली आता जरा प्रॅक्टिकली बघू.... 
आपल्या पैकी बऱ्याच जणांनी हा अनुभव घेतला असेलच कि एखादा सिनेमा उदा. सिंघम टाईपचा पाहिल्यानंतर थोड्यावेळासाठीच का होईना आपल्या शारीरिक हालचालीत झालेला बदल. किंवा बाबा आमटे सारखा समाजसेवेवर आधारलेला सिनेमा पाहिल्यावर आलेली अंतर्मुखता..... एखादी sad लव्ह स्टोरी ऐकल्या / पहिल्या नंतर प्रेमा बद्दलच्या बदललेल्या संकल्पना... देश प्रमाणावर आधारित सिनेमा पाहिल्यावर अचानक जागे झालेले देशप्रेम.... etc. etc.  खरंतर सिनेमा पाहण्यापूर्वी अन नंतर वातावरणात काहीही बदल झालेला नसतो ना शरीरात बदल घडतो.. ते सगळं फक्त मनात चालू असत.  असे अनेक उदाहरण देता येतील ज्याचा मनावर परिणाम होत असतो. अर्थात आपण आपलं मन आसपास घडणाऱ्या घटनांच्या हवाली केलेलं असत. त्याच आपल्याला घडवत असतात. (Either Temporary or Permanent).

"My life My Rules" असले Status ठेवणाऱ्यानी खरंच स्वताला प्रश्न विचारला पाहिजे कि जे Rules ते follow करतात त्यापैकी खरंच किती स्वताचे आहेत. अन किती adjustment केलेले आहेत. 
 
किती खोटं जगत असतो आपण, काहीजण अतिआत्मविश्वात, काहीजण न्यूनगंडात. कोणी स्तुती केली कि लगेच आपली छाती फुगून येते तसेच कोणी निंदा केली कि तेवढीच ती आत जाते, असं का बरं....? 
एखादा व्यक्ती आनंदाला जेवढा response देतो तेवढंच त्रास त्याला दुःखात भोगावं लागत, तरीही चेहऱ्यावरचं दुःख लपवत लपवत जगावं लागत.  
मनकवडा व्यक्ती दुसऱ्याच्या मनातलं ओळखू शकतो असं म्हणतात अर्थात खरंच मनात काय चालू आहे हे जरी त्याला समझत नसलं तरी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव किंवा हालचालीतील फरक यावरून तो काहीतरी अंदाज बांधत असणारयांचाच अर् मनातील विचार आपल्या वागण्याबोलण्यात  फरक पाडू शकतात हे ओघानं आलंचअसं जर असेल तर मनात ठणाऱ्या स्पंदनांना ओळखणे अगत्याचे होऊन जाते कारण त्याचा प्रत्यक्ष परिणाम आपल्या जगण्यावर होत असतो.  "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण...." यावरून असं लक्षात येत कि मन जर आपल्या ताब्यात असेल तर आपण काहीही साध्य करु शकतो. अर्थात मी काहि वेगळं सांगत नाहीये, याआधीही अनेक महापुरुष, संत, ऋषी, मुनी आणि धर्मग्रंथात सांगितलेच आहे. 
  जगभरातल कोणतंही मोठं आश्चर्य हे सुरुवातीला एक विचार म्हणूनच  जन्म घेतएखादं constructive मन जसं अखंड मानवजातीच्या कल्याणार्थ झटत असत  त्याउलट  दहशतवादी  मानसिकता असणार एखादं  destructive  संपूर्ण मानवजातीलाच नष्ट करू शकतं.
क्रमश : .... 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें