कोणतीही नवी गोष्ट शिकताना आपण ती दोनदा शिकतो १. मनाने २. बुद्धीने ... बुद्धी माहिती ग्रहण करते आणि मन संस्कार ग्रहण करतो. दोन्ही एकमेकांना जर पूरक ठरले तर ते ज्ञान... आणि जर परस्पर विरोधी ठरले तर अज्ञान "घोर अज्ञान".
उदा. सुरु असलेल्या एखाद्या इलेक्ट्रिक मशीन ला हात लावल्यावर शॉक लागू शकतो / मृत्यू होऊ शकतो हि झाली माहिती,अश्या गोष्टींना हात लावायचं नाही हा झाला संस्कार (त्यामुळेच भीती निर्माण होते) आणि असा प्रसंग आलाच तर योग्य काळजी घ्यायची हे झालं ज्ञान. अश्या मशीन च्या भानगडीत पडायचंच नाही हे झालं अज्ञान. (माझ्या बुद्धीला पटलं तेवढंच सांगितलं अधिकारी व्यक्ती जास्त योग्य प्रकारे समझून सांगू शकतील. मझ पामरासी काय थोरपण पायी ती वहाण पायी बरी...... )
" ब्रम्ह सत्यम जगत मिथ्यम.... " असे शास्त्र सांगते. या जगात जे काही चांगले-वाईट, उच्च - नीच,सुख दुःख, आशा निराशा, कमी अधिक, पाप पुण्य, त्याग मोह.....(या जोड्या मुद्दाम लावल्या आहेत कारण दोन्ही वेगवेगळ्या राहू शकत नाहीत ) अश्या अनेकानेक गोष्टीचे मूळ उगम "मन" हेच आहे त्याच बरोबर भीती, इर्ष्या, राग ई. फक्त मनातच राहू शकतात खरंच असं काही जगात अस्तित्वात आहे का हे प्रत्येकाने आपापलं शोधलेलंच बरं. मुळात मन हि काही स्थूल (rigid ) वस्तू नाही त्यामुळे आधुनिक विज्ञान त्याला समझू शकत नाही. ज्या पंच ज्ञानेंद्रियांवर बुद्धी कार्य करते त्याच input वर मनाचं कार्य चालत. पण गोम अशी आहे कि मन हेच बुद्धीला एक input आहे जे सगळ्यात खतरनाक आहे.
मनाचे कैसे वर्णावे रूप,
नाही त्यासी सुख तिन्ही जगी...... नंदकिशोर
क्रमश:
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें