मन...2 - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

17 नवंबर 2016

मन...2

PART - 2
स्वतःच मत स्वताला कितीही प्रिय असलं तरी त्याचा बाजार भाव शून्यच. कारण कधीकाळी मी एके ठिकाणी interview ला गेलो असता तिथल्या H. R. च्या एका प्रश्नाच उत्तर देत असताना अनावधानाने माझ्या तोंडून एक वाक्य निघालं ते असं ...
(मूळ उत्तर इंग्रजीत होत I Think .... ) 
" मला वाटत कि..... "
बस हे ऐकताच त्याच्या कपाळावर आठ्या, डोळे लाल (प्रश्न विचारण्यापूर्वी पण थोडेसे लालच होते). झाले आणि जस काही या जगात ८४ लक्ष योनींपैकी मीच काय तो सर्वात कनिष्ठ जीव असल्या प्रमाणे एका तुच्छ नजरेनं माझ्याकडे पाहत म्हणाला.
" तुला काय वाटत हे विचारायला तुला इथं बसवलं नाही."
बस त्याच क्षणी मला साक्षात्कार झाला कि, "माझ्या मताची मार्केट व्हॅल्यू शून्य. आहे "
(भूतकाळातली एक घटना: 
ईयत्ता ५ वी "अ " वेळ दुपारी १२.०० वा स्थळ: शाळेचे मैदान 
आजचा सुविचार :- "ऐकावे जणांचे करावे मनाचे")
मग शाळेत असताना शिकलेल्या या सुविचाराच काय करायचं.
पण याच्यातची एक ट्विस्ट आहे कि या सुविचारांचा अर्थ आपण कसा घेतो. म्हणजे परत मन आलंच. ज्याने सुविचार लिहिला त्याला जो अर्थ अपेक्षित आहे तोच अर्थ आपण घेणार याची शाश्वती काय अन आपण काढलेला अर्थ आपल्यावरच उलटा पडला तर काय करायचं.
एकूणच विषय गंभीर आहे, असं असेल तर मग कशाला या लफड्यात पडायचं असंही काहींच्या मनाला वाटू शकत. 
क्रमश...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें