माणसाला मन आहे, हि सोय आहे कि अडचण देव जाणे. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने जरी मन नावाचा कोणताही अवयव माणसाला नसला, तरी सहजासहजी कोणी हे मान्य करू शकणार नाही. मेंदू किंवा बुद्धीचाच एक भाग म्हणा किंवा आणखी काहीही म्हणा मनाचं अस्तित्व नकळतपणे सगळेच मान्य करतील, मन हे प्रत्येकालाच हवं आहे.
मानवी जीवनात त्याचे स्वतःचे जर काही असेल तर ते फक्त त्याचे मन आहे, त्याचे अस्तित्व तो नाकारू शकत नाही कारण त्याच्या अस्तित्वाच्या जोरावरच तो स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. बुद्धीहि तशी उपरीच म्हणायला हवी, कारण अगदी जन्माला आल्या पासूनच आपण कितीतरी गोष्टी शिकलो, कुठून शिकलो इतरांकडून ना ? पण त्यापैकी सोयीचं असं आपल्या अतींद्रिय भावनांना समरूप असलेलं किंवा मनाला जे पाटलं तेच फक्त आपण लक्षात ठेवतो ना..? जरी ते बुद्धीला पटत नसलं तरीहि ते मत आपण स्वीकारलेलाच असत. केवळ बुद्धीच्याच जीवावर मनुष्याला इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ समाजात असूनही त्याच बुद्धीच्या तुलनेत आपल्यापैकी प्रत्येक जाणंच मनाला नेहमी झुकते माप देत असतो. मग आता तुम्ही सांगा आपलं असं काय आहे...? इतरांकडून बुद्धीला मिळालेलं ज्ञान कि स्वताच्या मनाला पटत असलेलं मत.
क्रमशः
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें