थुंके - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

29 अप्रैल 2019

थुंके

थुंके

सक्काळ सक्काळी कॉलेजला पाळायची घाई त्यात सिग्नलवर कारमधून सद्गृहस्थाने थेट गुटखासदृश पदार्थ खाऊन पिचकारी मारली आणि नेमका मी त्याच्या कारजवळून पास झालो. साहजिकच पिचकारीने नेम साधला. कॉलेजात मशीन वाट बघत होती म्हणून (जल्ला तसली मशीन नै काई, थंब मशीन) मनातल्या मनात त्याचं शब्दसुमनांनी स्वागत करून तसाच निघालो. हे भिकारचोट थुंके कधी, कुठं आणि कसं पचकतील सांगता येत नाही.
असले मूर्ख रोजच्या प्रवासात खूपदा भेटतात. निवांत वेळ असला कि मग पंगा घ्यायला जमतो, कारण चूक त्यांची असते. असंच एकदा एक थुक्कड म्हतारा रोडच्या डाव्याबाजूनं गाडी चालवताना उजव्या बाजूला रोडच्या मध्यभागी पाचकल. मी मागेच होतो थोडक्यात चुकामुक झाली, पण मला वेळ होता. मी चिंगाट गाडी पळवून त्याला ओव्हरटेक केलं आणि त्याच्यासाखी कृती केली, पण त्याच्या अंगावर जाईल असं. म्हातारं चिडलं आणि जोरजोरात हॉर्न वाजवायला. मी स्पीड कमी करून पुनरावृत्ती केली. बहुतेक त्याच्या लक्ष्यात आलं, ते गपचूप निघून गेलं.
असले थुक्कड लोकं समाजात सगळीकडे दिसतात किंवा त्यांच्या असण्याचा पुरावा तरी मागे सोडतात. त्यात विविध पदार्थ वापरले जातात जस कि तंबाखू, गुटखा, मावा, पान,  पाणी...
ह्यांची आवडते ठिकाणं
१. बस मध्ये डाव्या बाजूच्या पत्र्यावर थुंकणारे
२. चालत्या बस मधून बाहेर थुंकणारे
३. दुचाकी वरून कुठेही थुंकणारे
४. कार मधून थुंकणारे
५. जिन्यात/ जिन्याच्या कोपऱ्यात थुंकणारे
६. ऑफिसात थुंकणारे
७. काहीतरी खाऊन थुंकणारे
८. काहीही न खाता उगीच खाकरून थुंकणारे (सर्दी झाल्यास तर विचारायलाच नको)
९. क्रिकेट खेळताना थुंकणारे (क्रिकेट पाहताना सगळ्यात गचाळ वाटणारा प्रकार, कॅम्रामन थॉय थॉय)
१०. एखाद्याच नाव काढलं कि त्याच्या नावानं थुंकणारे
 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें