मन - ७ - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

08 दिसंबर 2016

मन - ७

part - ७ 

Law of attraction  नावाची थेअरी सांगते कि आपण सतत जसा विचार करतो तश्याच गोष्टी आपल्या सोबत घडत असतात......
पण कोणी हे सांगेल का कि आपण सतत चांगलाच विचारच कस काय करू शकतो..... प्रयत्न करून बघा.....!!!! 

मन हे dual power  सप्लाय सारखं आहे जेवढं positive तेवढंच negative... (कोणाला शंका असल्यास मला भेटा)

समजा,
आपल्या एखाद्या मित्राचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे अन तो  solution मागायला आला तर बहुतेक वेळा आपण त्याला दोन मिनिटात सल्ला दिला असेल (९० %), पण तसाच प्रसंग स्वतः सोबत घडल्यावर तेच solution स्वतः apply करून दाखवा बर.... (१० %) 
(अजून एक कंसातलं उदाहरण देतो - एखाद्या भांडणात (matter) मध्ये ज्यात आपण स्वतः involve नसता त्याबद्दल ची चर्चा करताना, "मी हे केलं असत ते केलं असत" अश्या आपल्या गप्पा आपल्याला चांगल्याच माहित आहेत अन खरंच जेंव्हा कधी अशी वेळ येते (अन कधीतरी येतेच, देव बघतोय वरून ) तेंव्हा आपण काय करतो हेही माहीतच आहे (काहीजण अपवाद असू शकतात....**))

जेंव्हा इतरांना सल्ला देतो तेंव्हा आपण "एक" असतो, स्वतःच्या बाबतीत आपण "दोन" असतो. 

बऱ्याच वेळा आपण बोलताना समोरच्याला (किंवा मनातल्या मनात) असं म्हणतो कि तुला माहिती आहे का तू कोणाशी बोलत आहेस वगैरे वगैरे.... त्या बिचार्याला काय माहित आपण कोण आहोत ते ...  पण आपल्या स्वतःला तरी माहित आहे का कि आपण कोण आहोत....? आपण कसे दिसतो....? आपला स्वभाव कसा आहे....? आपण स्वतःला ओळखतो का....? 


unfortunately  याचं उत्तर नाही असच आहे.... 

(** या ठिकाणी त्या अपवाद पैकी मी पण आहे असं वाटण्याची शक्यता आहे... )

क्रमश:..... 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें