मैत्रीण पाहिजे अशी
कधी कधी तिढ्यात
कधी कधी कोड्यात
कधी गोडीत बोलणारी...
मैत्रीण पाहिजे अशी
कधी सुख वाटणारी
कधी दु:ख वाटणारी
कधी समजून घेणारी...
मैत्रीण पाहिजे अशी
कधी आपलंस करणारी
कधी अश्रु पुसणारी
कधी कधी झापणारी..
मैत्रीण पाहिजे अशी
नेहमी मन जाणणारी
ह्रदयात बसणारी
गालात हसणारी..
मैत्रीण पाहिजे अशी
वाट दाखवणारी
कौतुकाने पाहणारी
संकटात हात देणारी...
मैत्रीण पाहिजे अशी
ओठावर हसु आणणारी
कधी डोळे वटारणारी
चुकलं तर कान धरणारी...
मैत्रीण पाहिजे अशी
जीवाला जीव देणारी
कधी भाव खाणारी
कधी भाव देणारी...
मैत्रीण पाहिजे अशी
कधी तिखट बोलणारी
कधी तिखट वागणारी
कधी गोडी लावणारी...
मैत्रीण पाहिजे अशी
मंजुळ पाव्यासारखी
दुधाच्या खव्यासारखी...
10 फ़रवरी 2017
New
मैत्रीण...
About Noob
SoraTemplates is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of SoraTemplates is to provide the best quality blogger templates.
एका अनावर कैफात...Jan 10, 2018
रमलखुणांची भाषाDec 06, 2017
आतचं पडलं एक स्वप्न...Apr 07, 2017
मैत्रीण...Feb 10, 2017
Labels:
दुसऱ्यांच पण आवडलेलं काही…
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें