अशी फक्त राधाच...
कृष्णाला विचारलं कोणीतरी
तुला राधेचं प्रेम
का सर्वश्रेष्ठ वाटतं?
एक छानसं स्मितहास्य करून
त्याची नजर स्थिरावली
अथांग त्या आकाशात.
आकाश आणि सागराचा
थांग कधी लागत नाही
अथांग प्रेम करणारी
अशी फक्त राधाच.
मी सोबत असावं असं वाटणाया कितीतरी,
मी कोणासोबतही असलो तरी
नेहमी सुखातच रहावं ही अपेक्षा करणारी
अशी फक्त राधाच.
माझ्यावरचं प्रेम बोलून दाखवणाया कितीतरी,
पण नजरेतून सगळं व्यक्त करणारी
अशी फक्त राधाच.
बोलता येत नाही सगळंच काही,
मी न बोलताही मनातलं समजून घेणारी
अशी फक्त राधाच.
अखंड माझा ध्यासच
झालाय जिचा श्वास
अशी फक्त राधाच.
आणि म्हणूनच...
सगळे म्हणतात मला स्थितप्रज्ञ,
मात्र माझ्या प्रज्ञेतही स्थित झालेली
अशी फक्त राधाच.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें