मी एक वठलेलं झाड
मी एक वठलेलं झाड
ज्याच्याकडे बीजही नाहीत
पुन्हा नव्याने अंकुरण्यासाठी.
मी एक वठलेलं झाड
ज्याच्याकडे पानेही नाहीत
वाटसरुंना सावली देण्यासाठी.
मी एक वठलेलं झाड
ज्याच्याकडे फांद्याही नाहीत
पक्ष्यांना घरटं बांधण्यासाठी.
मी एक वठलेलं झाड
ज्याच्याकडे श्वासही नाहीत
इतरांना श्वास देण्यासाठी.
मी एक वठलेलं झाड
ज्याच्याकडे टवटवीतपणा नाही
विषण्ण मनाला फुलवण्यासाठी.
मी एक वठलेलं झाड
ज्याचं जगणंही आहे दिशाहीन
स्वत:साठी व इतरांसाठी.
मी एक वठलेलं झाड
ज्याच्याकडे बीजही नाहीत
पुन्हा नव्याने अंकुरण्यासाठी...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें