मी कसा...
खूप विचार करतोय
मी कसा आहे म्हणून?
पण मी कसा ते
माझंही मला कळलंच नाही.
अगदी अनपेक्षित,
कधीच वाटलं नाही की असंही वागेल,
थोडं कमी पडलं म्हणून
इतर गोष्टींच्या मागे लागेल.
वाटायचं, खूप उंच शिखरावर बसलोय
तिथून कधीच डळमळणार नाही,
आयुष्यभर मलाच जपलेलं मी
कधीच कोलमडणार नाही.
पण फक्त वायाच्या एका झोताने
असा काही पडलोय,
उंच शिखरावरून निसटून
खोल दरीत कोसळलोय.
क्षणात सारे संस्कार
मातीमोल झाले,
माझं ठरवलेलं मोल
कवडीमोल झाले.
कधीच विचार केला नाही
असा मी वागलोय,
जगाचं सोडा, पण आज
माझ्याच नजरेत मी पडलोय.
खरंच, आयुष्य जसं अनपेक्षित असतं
तसंच आपल्याही नकळत आपलं वागणं,
कितीही ठरवलं जपायचं स्वत:ला तरी
मन सोडत नाही भरकटणं...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें