कधी मला वाटतं...
कधी मला वाटतं
धावत तू यावं
मिठीत मला घ्यावं,
पण मला अस्वस्थ करतं
तुझं माझ्यापासून दूर असणं
कधी मला वाटतं
जवळ तू यावं
प्रेमाचे चार शब्द बोलून
तृषार्त ह्मदय तृप्त करावं,
पण सदैव मला सतावतं
तुझं अबोल राहणं
कधी मला वाटतं
माझ्या हातात हात गुंफून तू
सर्व दुनियेला विसरुन
माझ्या डोळ्यात पहात रहावं,
पण बैचेन करतं मला
तुझं माझ्यापासून नजर चोरणं
खरंच! किती विचित्र आहे
तुझं माझ्यापाशी नसून असणं,
आणि स्मृतींमध्ये येऊन
नेहमी मला सतावणं
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें