नदीकाठचं एक झाड
नदीकाठी असणारं एक झाड
देतंय माझ्या उत्कट जीवनाची साक्ष,
आणि कालच समजलं
तेही वादळात कोलमडलं.
दुनियेला उबगून जेव्हा
जायचो त्याच्यापाशी,
त्याचा वारा करायचा गुदगुल्या
केवळ मला हसवण्यासाठी.
त्याचा गडद छायेखाली
मूक ढळणाया अश्रूंसाठी,
साथीला माझ्या थोडी
पानांनी सळसळ केली.
माझ्या मनाचा पारवा
अजून तिथंच घुमतोय,
थोडसं टेकायला
अजून जागा शोधतोय.
त्याच्या फांदी-पानांतून डोकावणारी किरणं
अनामिक चैतन्यानं भारणारी,
दु:ख, भावना मनात दाबून
स्थितप्रज्ञ राहण्यास शिकविणारी
घुसमटणारे अनेक श्वास
विसावले जिथे माझे,
तेच झाड आज
नि:शब्द करून गेले.
माझ्या गतकाळाची साक्ष असणारं झाड
तेही वादळात कोलमडलं,
या परक्या जगात
पोरकं मला करून गेलं.
नदीकाठी असणारं एक झाड......
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें