भेट ....
हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यों है.......अब तो हर वक्त यहीं बात सताती है हमें....
हाच विचार नेहमिच्या भेटी नंतर मनात यायचा....
आणि उदास उदास वाटायचं...
मग एकटेपणात शांत शांत गुरफ़टून बसायच...
तासभर एकाच जागी बसून पूर्ण भेट आठवायची..
त्यातला क्षण क्षण मनाच्या एका कप्प्यात नीट जपून ठेवायचा..
पुढच्या भेटीपर्यंत त्या आठवणींवर जगत रहायचं
रोज नव्यानं त्या आठवणी कप्प्यातून काढून त्यांना न्हाऊमाखू घालायचं..
मग काय तर डोळ्यातील आसवांचा सर्वात उत्तम उपयोग हाच...
आणि दिवस मोजत जायचे....
पुन्हा एकदा भेटीचा दिवस जवळ येऊ लागताच आनंदून जायचं...
हरखून जायचं त्या दिवसाला समोर ठाकलेला पाहून...
ते क्षण हातात असले की पुन्हा म्हणायचं.....
जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें...........ये जमीं चांदसे बेहतर नजर आती है हमें.....
छाया थोरात
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें