Extension हेल्मेट आणि आणिबाणी...
हेल्मेट घालून निघालं की डोक्यात खाज येणं, कान गुदगूदनं मुद्दाम केल्यासारखं होत. नाईलाजान सहन कराव लागतं.
आज सकाळी सकाळी बाहेर निघताना हेल्मेट डोक्यावर चढवलं, निघालो. थोड पुढं गेलो, धुळ... काचाचं शटर खाली ओढलं. गर्दी सुरु झाली आणि भस्सकन एक कोळी काचावर प्रगट झाला...हेल्मेटच काच डोळ्याच्या ईतका जवळ असतो त्यामुळं कोळी आतमधूनय का बाहेरुन काहिच कळेना. घरात जाळे करतात म्हणून दिसला की झाडू किंवा चपलेचा प्रसाद नेहमीचा असल्यामुळे त्यांच्यातलाच एखादा बांधव बदला घ्यायला आला की काय, ऊगीच शंका...त्या तसल्या परिस्थितीत मख्खी चिञपट आठवायला लागला...
पोलिसांनी पकडलं तर बघू...मी चालत्या गाडीवर हेल्मेट काढून हॅंडलला टांगल.
कोळी कुठं गेला माहित नाही पण ऊगीचच चेहर्यावरती ईथे तिथे जाळ्यांची वळवळ माञ जाणवत होती...ऊतरे पर्यंत...
---धनंजय लांब
६-२-२०१६
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें