हेल्मेट आणि आणिबाणी... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

05 फ़रवरी 2016

हेल्मेट आणि आणिबाणी...

हेल्मेट आणि आणिबाणी...

औरंगाबादेत हेल्मेट सक्ती लागू व्हायच्या आधीच पंधरा दिवस आमच्या संस्थेमध्ये सुरुवात झाली, हेल्मेट नाही तर संस्थेच्या बाहेर गाडी लावायची न पायीपायी जायच. नाही म्हटलं तरी 4-7 मिनीटं लागतात पायी जायला. (शिकत असल्यापासनं वेळेवर किंवा वेळेपेक्षा ऊशिराच निघायच ग्रहण मागंच आहे जे अजून सुटलं नाही) मग काय दोन-तीन दिवस लागले अंदाज यायला, न आणिबाणी...गाडी पळवा...
पुन्हा तीन-चार दिवस गेले न संस्थेच प्रेमपञ, हेल्मेट नसलेल्यांच्या नावानं. हा काय ञास आम्ही तर कसलिही तक्रार न करत मुकाट्यांन पायी जातच होतो की, पुन्हा दुसर्‍या दिवशी तेच...प्रेमपञ...पुन्हा आणिबाणी...मग तितक्याच ऊत्साहात (???) गेटपास (हेल्मेट) घेतला, अर्थातच नावाला म्हणून लोकल. पहिलाच दिवस त्या प्लॅस्टिकच्या टरकलाचा ऊग्र दर्प डोक्यात जायला लागला तोही भर गर्दीत...मळमळ...डचमळ...पुन्हा आणिबाणी... पण तसं काही झालं नाही, कसातरी पार पडलो, सुटलो. ऊतरल्या ऊतरल्या ते टरकल असं भिर्रर्र फेकून द्यावसं वाटल पण जागेवरच एकदा आपटून भागवून घेतलं. घरी येताना अंधारात त्या समोरच्या प्लॅस्टीकवरुन लाईट रिफ्ल्केक्ट व्हायली, पुन्हा ऊग्र दर्प, पुन्हा फेकावसं वाटल, पण नाईलाज. बाबा पेट्रोलपंपाजवळ आल्यावर काढून हॅंडलला अडकवलं. प्रचंड वाहनांची गर्दी अन् खड्यांचीही...हेल्मेटही नाचायलं, हॅंडलमध्ये अडकायलं, चालत्या गाडीवर अॅडजस्ट करायला गेलो (आमच्या यायच्या वेळेला प्रचंड वाहतो रस्ता, कंपन्यांच्या गाड्या आॅफिसेस सुटण्याची वेळच ती. जे वाळूजहून येतात तेच समजू शकतात ती आणिबाणी) हेलकावा...प्रयत्न सोडला न कार्तिकी हाॅटेल चौकात सिग्नलवर गाडी थांबवताना हेल्मेट गाडी संभाळावी की पडणारं हेल्मेट ही आणिबाणी...अखेर हेल्मेट धरण्याच्या नादात समोरच्या गाडीचा (धाडकन) आधार घेत गाडी थांबली(?) त्यानही एकदा माझ्याकडं न एकदा पडत्या हेल्मेट कडं बघितलं... एक मोठीशी स्माईल...सगळं सुरळीत. पुन्हा नाईलाजान डोक्यावर...दुसर्‍या दिवशी झेंड्याला जाताना थंडी वाजली नाही, केसंही रखरखीत झाले नसल्याचं जाणवलं (हं चिपक्कली माञ झालं) हेल्मेटचा हा एक फायदा कळाला. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा...आताशा सवय पण झाली, मळमळ ही नाही, हॅंडलला अडकवायच्या वेगवेगळ्या पद्धती ट्रायल अॅंड एरर बेसिस वापरुन अवगत करुन घेतल्या. आता पुर्ण पंधरा किलोमिटर जाणं आणि पंधरा येणंही हॅंडलला अडकवून लिलया करता येतय. माझं पुराण झालं.
हेल्मेट सक्ती औरंगाबादेत लागू...भावाला हेल्मेट घ्यायचं...डी-मार्ट मध्ये चांगले हेल्मेट रास्त भावात ऊपलब्ध असल्याची कुणकूण लागली सकाळी 9:30 लाच (हाफ डे टाकून...आणिबाणी...नाहीतर दंड...वरुन समूपदेशन...एस.पी आॅफिस ची चक्कर...लघूपट...एकंदरीत दंड तर दंड वरुन मनःस्ताप...संदर्भ वृत्तपञातल्या बातम्या) हजर झालो, हजार बाराशेची गर्दी, थक्क, आणिबाणी...एवढी गर्दी मी BSNL चे कार्ड घेताना 2005-06 मध्ये अनुभवली होती. 9:30 चे 10:30 झाले, गर्दीचा अंदाज घेऊन अन् पुढील शक्यता लक्षात घेऊन गेट बंदच. (मागील तीन दिवसांपासून हीच स्थिती होती म्हणे) एकदाचं गेट ऊघडलं, आणिबाणी...ढकलाढकली, रेटारेटी, पुन्हा मागं. पन्नासेक हेल्मेट विकून स्टाॅक संपल्याची घोषणा. TV centre चं मार्केट, लोकलच पण टूच्चे, थिटे हेल्मेट, तोंडच ऊघडायची सोय नाही हेल्मेट घातल्यावर. पुन्हा दुसरं दुकान, तिसरं...सारखीच परिस्थिती. डायरेक्ट क्रांतीचौक जावं, ठरलं. मोंढानाका ऊड्डान पुल, अर्ध्यापर्यंत जाम, हेल्मेट सक्ती, तपासणी, दंड जसा आदल्यादिवशी वृत्तपञात फोटो पाहिला होतो तस्साच... मोंढानाका ते क्रांतीचौक, एरवी दोन मिनीटांच अंतर वीस मिनीटांत अन गाडीच्या मागच्या left side च्या Indicator चा बळी देऊन पार पाडलं. एकदाच दुकान समोर...बंद...सायंकाळी सहा वाजता ऊघडणार म्हणून सांगावा...संताप...समोरच एक दुकान असल्याची माहीती...बहुतेक जणांना माहीत नसाव म्हणून आणिबाणीतही चार-पाच गिर्‍हाईक. भेटलं एकदा मनासारखं...
पण काहिही म्हणा, डोक्याला, तोंडाला, कानाला, डोळ्यांना हवा लागत नाही म्हणून माझ्यासकट जवळपास सगळ्यांच्याच गाड्या नकळत 50-60 पर्यंत पळताना दिसतायेत. राञी नऊ दहा वाजताही मी फिरायला निघतो तेंव्हाही हे हेल्मेटधारी दिसतात...जणू आणिबाणीच...

                                                                ---धनंजय लांब
५-२-२०१६

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें