वाका कुणास ठाऊक...
आज का कुणास ठाऊक पण,
तू...खुप जास्त आठवलीस
तुझ्या आठवणींचा पडतोय,
शब्दातून म्हणूनच...किस...
आज का कुणास ठाऊक पण,
अनुभववावं वाटतंय तुला
फक्त बघण्या एकण्यासाठी,
माझं मन छळतय मला...
का कुणास ठाऊक पण,
सगळ्यांमध्ये बसुनही आज
मी एकटा एकटाच होतो,
तुझी आठवण अशी दूर घेऊन गेली
अन मी शुन्यातच होतो...
कुणास ठाऊक पण आज मी,
आगतिक माञ झालो होतो
स्वतःच्याच कस्तुरीला शोधण्यासाठी
ऊर फाटेस्तोवर धावणारा
अजागळ मी झालो होतो...
बघ आठवून तुलाही आज,
भास माझा झाला असेल
नसेल झाला ठीक आहे,
माझ्या मनाचा खेळ असेल...
शब्दांच्या पलिकडंच नाही बधत,
शब्दांमध्ये यायला
कुणास ठाऊक तुला कधी जमेल
माझ्यासारखंच व्हायला...
एक दिवस तू...नक्की येशील,
हे माञ तेवढंच खरं
असशिल नसशिल माझी जरी,
तू...च माझ्या प्रेमाचा ईश्वर...
कुणास ठाऊक पण आज माझ्यात,
फक्त तू...नी तू...च आहे
कुणास ठाऊक पण आज मी,
फक्त तुझा न तुझाच आहे...
Missing you badly
---धनंजय लांब
२-२-२०१६
वेळ राञी १२:२९
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें