सुट्टीची भकास एकटी संध्याकाळ मला पुन्हा तिथंच घेऊन आलीय, TV center च मैदान, सिगरेट्स, मी, एकटेपणा, रिकाम भन्न डोकं ...फिरलो, ईथं तिथं डोक लावल, पण व्यर्थच....
हिच ती जागा जिथं मी गेली आकरा वर्ष झाले अशाच वेळी येतोय सगळं जसच्या तसं अन् आज आलोय त्याच स्थितीत. डिप्लोमाचा मॅथ्स, डिग्रीचा गोल्डनवरचा पुन्हा मॅथ्सच, Masters च Dissertation, बेरोजगारी, तिची पहिली भेट, घरातली भांडणं, संताप, चिडचिड, रडणं, तिला पाठवलेला पहिला मॅसेज, नर्व्हसनेस, एकटेपणा, खंत...कित्तीतरी गोष्टींची साक्ष आणि ईथला अंधार, भकासपणा...पुन्हा ईथूनच लिहितोय...ईथंच बसून...
शनिवार 6-2-2016
8:23 pm
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें