बॅगेवरचा बूट आणि बूटासारखी बॅग... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

22 अक्तूबर 2015

बॅगेवरचा बूट आणि बूटासारखी बॅग...

काही वर्षांपुर्वी समोसा 80 पैसे आणि मोबाईलचा काॅल 8 रुपये होता, आता समोसा 8 रुपये आणि मोबाईलचा काॅल 80 पैसे झालाय. कोण म्हणतय महागाई वाढलीय? फक्त ईकडलं तिकडं झालंय...ही post मोबाईलवर धडकली आणि शुन्य मिनीटांत पाच-सहा विचार ह्याबरोबर पटापट Link up झाले. सगळे विचार मग ठरवूनही मनातुन जाईनाच झाले. सगळेच नाही लिहीत बसत, फक्त एकच...
एक दिवस प्रॅक्टिकलच्या एका बॅचमध्ये Experiment समजाऊन सांगताना सहज एका विद्यार्थ्याच्या बॅगकडे लक्ष गेले, बूटाची डिझाईन...आणखी एका विद्यार्थ्याची बॅग पुन्हा बूटाची डिझाईन...
एके काळी बॅग ज्यामध्ये आपण आपली विद्या ठेवतो, पाय लागला की पाया पडायचो, आता ईकडचं तिकडं...
काॅलेज बॅगवर बूटाचं डिझाईन किंवा बूटाच्या डिझाईन ची बॅग (असते, मी पाहिलीय...) ही गोष्ट योग्य की अयोग्य तुम्हीच ठरवा, मी माझं मत लादत नाही, पण मला खटकलं म्हणून लिहीलं...
---धनंजय लांब

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें