तू येशील का?
तू माझ्या मनात
इंद्रधनू जसा नभात,
वारा जसा रानात
सुगंध जसा फुलांत
तरी मी चाचपडत आहे
नव्या वाटा शोधत आहे,
तुला सापडता- सापडता
मीच स्वत: हरवत आहे
वाटतं कधी येशील तू
अंधाराला भेदत
किरण होऊन,
आशेचा कवडसा
जातो तिरीप पाडून
आयुष्य हे गुढ अंधारात
असेच का मिटून जाणार आहे?
रेशीमधागे ह्मदयातील का असेच
गुंतून राहणार आहेत?
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें