तू नव्हतासच माझा कधी... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

05 अगस्त 2017

तू नव्हतासच माझा कधी...

तू नव्हतासच माझा कधी...

तू नव्हतासच माझा कधी,
पण कळलंच नाही मला हे आधी.

माझी नजर दूर-दूरपर्यंत
फिरतेय तुला शोधत,
पण माझा शोध
संपलाच नाही कधी.

अजूनही मला आठवतात 
तुझे ते डोळे, प्रत्येक तुझा शब्द,
जे जाणीव करून द्यायचे की 
मी फक्त तुझाच आहे.

जे आणि जसं पाहिजे तुला
ते आणि तसं सर्वस्व तुला दिले,
पण कळलंच नाही मला तेव्हा
तुझे ते डोळे व शब्द
तुझ्यासारखेच फसवे होते.

खरंच, खूप वेडी होते मी,
का एवढी आंधळी झाले होते
माझंही मला कळलंच नाही कधी,
तू नव्हतासच माझा कधी
पण कळलंच नाही मला हे आधी.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें