वर्गात interrupt शिकवायला चालू होतं. व्याख्या, व्याप्ती अन् एक-दोन real time उदाहरणं देउन झाली. तेवढ्यात दरवाजाची कडी वाजली, फिडबॅक... अन् मी विद्यार्थ्यांना म्हटलो, is called as??? एका सुरात उत्तर आलं interrupt... फिडबॅकसाठी आलेल्यांच्या कपाळावर पडलेल्या आट्या नजरअंदाज करत अन् हास्याची उबळ आवरत वर्गाच्या बाहेर पडलो.
चांगल्या रंगात आलेल्या तासात interrupt आल्यामुळं मनातल्यामनात चडफडत त्यांना ओरडून सांगावसं वाटत होतं , हे असले कृत्रीम फिडबॅक घेण्यापेक्षा वर्गात कुणी नसताना सगळ्या बाकड्यांवर येउन बसा एक-एक मिनीटं, वाचा की त्यावरचं. बर्यापैकी फिडबॅक मिळेल. झालंच तर पोरांच्या वॉशरुममध्ये पण चक्कर मारा, वर्गाच्या भिंती वाचा, विद्यार्थ्यांच्या वह्यांचे शेवटचे चार पानं तपासा. staff अन् students, अनेकांचा फिडबॅक मिळेल. असेल अक्षेपार्ह तर सोडून द्या पण जेवढा वर्गात मिळेल त्यापेक्षा कितीतरी प्रामाणिक मिळेल.
28 अक्टूबर 2017
New
फिडबॅक...
About Noob
SoraTemplates is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of SoraTemplates is to provide the best quality blogger templates.
साला मीच का???
Labels:
माझ स्वतःच लिहिलेलं काही…,
साला मीच का???
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें