मन शुद्ध करण्यासाठी कायद्याचा कोणताही वचक किंवा कोणतीही मदत उपलब्ध नसताना एक रात्र म्हणजे तब्बल बारा तास येथेच्छ धुमाकुळ म्हणजे The Purge. ज्या व्यक्तीं/समुहाबद्दल राग/चीड आहे, त्यांचे सर्रास मुडदे पाडणे म्हणजे The Purge.
जवळपास एकाच घरामध्ये घडणारे हे कथानक एका कुटूंबावर चित्रीत केलेले आहे. या कुटूंबातील कर्ता पुरुष Purge मधल्या सांभाव्य हल्ल्यांपासून बचावासाठी उपयुक्त अशा संरक्षण यंत्रणा विकत असतो.
चित्रपटाची सुरुवातच Purge च्या संकलीत live feeds ने होते, तिथेच चित्रपटाची भयानकता दिसायला चालू होते. Purge सुरु झाल्यानंतर, घरातील तरुण मुलीचा प्रियकर मित्र अन् बाहेर मदत मागणारा कृष्णवर्णीय व्यक्ती एकदाच घरातल्या सदस्यांसमोर येतात तिथून पुढे चित्रपटाचा वेग वाढायला सुरुवात होते.
मदत मागून घरात आलेल्या त्या व्यक्तीला मारण्यासाठी बाहेर एक समूह येतो अन् त्याला बाहेर पाठवण्यासाठी धमकीवजा इशारा देतो.
पुढे काय होतं ते प्रत्यक्ष चित्रपट पाहूनच समजून घेतलेलं बरं.
हॉरर जेनरच्या या चित्रपटाचे तीन भाग आलेले आहेत आणि चौथा भाग २०१८ मध्ये येऊ घातला आहे.

IMDb Rating: 5.7/10
टीप: तुम्हाला हिंदी dubbed version हवे असल्यास प्रतिसादात ई-मेल टाका. कार्यस्थळी ब्लॉगस्पॉट गंडलेलं असल्या कारणानं जेंव्हा घरी जाईल आणि मूड असेल तेंव्हा नक्कीच लिंक ई-मेल करेल.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें