उभा आहे मी जिच्यावर
ती वाट कोणती?
स्वप्नात तर होती तिच्यावर
आरक्त फुलं पसरलेली
ही वाट कोणती?
हे हमरस्ते कोणते?
ज्यांची साथ होती हवी
तेच का दुरावलेले?
ही वाट माझी
अशी दूरवर पसरलेली
वठलेल्या वृक्षानंही गहिवरावं
अशी उजाड झालेली
टपोरं चांदणं शिंपलेली
नक्षत्रानं रांगोळी काढलेली
वाट यायची स्वप्नात,
प्राक्तनात मात्र ती
खाच-खळग्यांनीच भरलेली
जोडलेल्या रस्त्यांचीही पुढे
ताटातुट होत होती,
आसवांनी भिजवलेली चिंब
ती वाट कोणती?
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें