एका पाठोपाठ एक अशा तीन कविता, स्वप्नामध्ये??? (ऐ hello, मनी वसे ते स्वप्नी दिसे तसली काय भानगड नाय, अन् गेले कित्येक दिवस कवितेनं माझी कट्टी घेतलीये) आणि स्वप्नामध्ये कविता येण्याची ही पहिली वेळ नाहिये, पण तीन-तीन. असो मला तर जाम आवडलं!!! सकाळी ऊठल्यावर आठवायचा जोरदार प्रयत्न केला पण तोपर्यंत एक वाक्य सोडून सगळंच flush out...
माझ्या मागे बोलतो अबोल पाऊस मला...
माझ्या मागे बोलतो अबोल पाऊस मला...
तसाच जसा आधीही बोलायचा,
आता फक्त अधिरता विझवून टाकतो,
आधी आगतिकतेची आगच लाऊन जायचा...
अबोल पाऊस मनाची घालमेल ओळखून जायचा,
तिच्या घराहूनच ईकडे आलोय,
तिचा सुगंध मनात भरून जायचा...
स्वप्नातच आला आज न रहावून जणू सांगायला,
येतोय मी पुन्हा तसाच बोलायला...
थांबलेल्या कविता नव्याने द्यायला...
माझ्या मागे बोलतो अबोल पाऊस...
तसाच जसा आधीही बोलायचा माझ्या मनाला...
तसाच जसा आधीही बोलायचा,
आता फक्त अधिरता विझवून टाकतो,
आधी आगतिकतेची आगच लाऊन जायचा...
अबोल पाऊस मनाची घालमेल ओळखून जायचा,
तिच्या घराहूनच ईकडे आलोय,
तिचा सुगंध मनात भरून जायचा...
स्वप्नातच आला आज न रहावून जणू सांगायला,
येतोय मी पुन्हा तसाच बोलायला...
थांबलेल्या कविता नव्याने द्यायला...
माझ्या मागे बोलतो अबोल पाऊस...
तसाच जसा आधीही बोलायचा माझ्या मनाला...
#mindsriot
#स्वप्नातल्या_कविता
#धनंजय
#स्वप्नातल्या_कविता
#धनंजय
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें