माझ्यावर जर कुणी कविता केली असती,
कसं सांगू काय माझी स्थिती झाली असती...
कशीही जरी केली असती,
चांगली, वाईट, स्तुती, बोचरी...
कुणीही जरी केली असती,
मिञ, मैञिण वा कोणतीही व्यक्ती...
आनंदाने तिला मी मिठीच मारली असती,
वाईट, बोचरी असती तरी मला आठवू आठवू केली
एवढी गोष्टच पुरेशी असती...
स्तुती, चांगली असती तर मग
मनाच्या समाधानाची गरजच नसती...
जर माझ्यावर कुणीही...
कसलिही कविता केली असती...
मिञ असता तर पार्टी
मैञिण असती तर चहा
कुणीही दुसरं असतं तरी
डोक्यावर तिला घेतली असती...
तू...असतीस तर...
लिहीता हात हातात घेताना
माझ्याही हातांना ओठ व्हायची
ईच्छा माञ झाली असती...
माझ्यावरती जर कुणीही कविता केली असती...
माझ्यावरती जर कशीही कविता झाली असती...
माझ्यावरतीही जर तू...ही कविता केली असती...
...धनंजय लांब
... mindsriot.blogspot.in
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें