गझल मी ऐकवित गेलो
रंग मैफिलीत भरीत गेलो,
दु:खालाही इथे माझ्या
दाद मिळवत मी गेलो.
होती काही गाणी सुखाची
तर बरीचशी होती दु:खाची,
तान मी छेडीत गेलो
रंग मैफिलीत भरीत गेलो.
वाद्यांनी साथ सोडली तरी
एकटा मी गात गेलो,
आयुष्यातल्या स्वप्नांचीही
पानगळ मी पाहत गेलो,
सुन्या मैफिलीतही माझ्या
रंग भरीत मी गेलो.
जीवनातील चढ उतारांनाही
आलाप समजत मी गेलो
भरल्या मैफिलीत नम्रतेने
रंग भरीत मी गेलो.
मरतानाही शेवटचा श्वास
गझलेला समर्पित करीत गेलो
चितेवरच्या ज्वालांनीही
गीत माझे फुलवीत गेलो
दर्दींच्या या मैफिलीत
रंग माझे भरीत गेलो.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें