ऊन्हाळा... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

31 मई 2015

ऊन्हाळा...

Insult नाही करणार मी तरी या उन्हाळ्याची ना कोणत्याच ऋुतूची. काय चुकतयं त्याच? तो आहेच तसा...गरम. माहितीय त्याची काहिली मी ऊन्हात ऊभा राहून सहन करु शकत नाही, पण मग कृञिमपणे हाकलूनही नाही देऊ शकत त्याला, तसा स्वभावच नाही माझा फटकळ. अनुभवतोय त्याला जसा झेपेल तसा. कधी ऊन्हात ऊभा राहून, कधी झाडाखाली बसुन... आणि ऊन्हाळा नाही अनुभवला तर पावसाळा कसा कळणार? हिवाळा नाही अनुभवला तर ऊन्हाळा कुठून अनुभवणार? जिंदगीच पण तसच असत...जो अनुभवतो तो लिहीतच बसतो, न अनुभवणारा आपल्याच दुनियेत मस्त असतो. Choice is yours, अनुभवायचं की मस्त रहायचं? ऊन्हाळा रुक्ष तर मग का येतो अंब्याला मोहोर, आमरस खाऊन निवांत देतो तृप्तीचा ढेकर... रुक्ष पणे तो पानगळही करतो पण, नवपालवीचा आशिर्वाद ही देतो! रुक्षपणाच्या शापामध्ये त्याच्या दडलेला असतो उ:शाप, नका देऊ शिव्याशाप त्याला, होईल पुर्ववत आपल्याआप...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें