लिहीणारे लोक! - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

27 मई 2015

लिहीणारे लोक!

भावना लिहून कढणारे लोक...माझ्या मते तरी खूप चांगले असतात...कारण ते त्यांच्या भावनांना लिहून वाट काढून देतात...प्रेम/राग/दु:ख/लोभ/अगतिकता...अगदी अगदी सगळ्या...आणि खुपच कमी वेळेस आणि खुपच कमी जण त्या प्रत्यक्ष त्या व्यक्तीला व्यक्त करतात.
लिहून काढण्याचा फायदा असा होतो की, आता या भावनांची तिव्रता बर्‍यापैकी कमी झालेली असते.
कुणितरी म्हटल आहेच की मुर्ख लोक बिनधास्त असतात आणि हुशार लोक साशंक असतात. म्हणून मुर्ख लोक तोंडावर बोलुन दाखवतात (हे सगळ्यांनाच आवडते असे नाही, निदान मला तरी नाहीच). लिहिणारे लोक शक्यतो (शक्यतोच) बोलुन दाखवतात, पण त्यातही भरपूर वेळेस त्यांना मन:स्तापच सहन करावा लागतो...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें