असं कितीतरी वेळा... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

27 नवंबर 2015

असं कितीतरी वेळा...

असं कितीतरी वेळा...

असं कितीतरी वेळा घडलय की, 

मी तुला आठवावे
आणि तुझा फोन यावा...

तुला ऐकू वाटावे

आणि तु समोर असावे...

मी काही बोलायच्या आत 

तु माझेच शब्द चोरावेत...

माझ्या मनातल्या कल्पना

तु मलाच बोलून दाखवाव्यात...

तुझ्या बरोबर फिरु वाटे

आणि खरंच तू सोबत असावे...

माझं खोट बोलनं

फक्त तुलाच कळाव...

तुझ्या फक्त नसण्यान

मी गर्दीतही एकट पडाव...

गाणं ऐकताना एखाद

डोळ्यासमोर तूच...असावं...

दूर जाईन म्हणता तुझ्यापासून

आणखी जास्त जवळीक वाटावी...

तरीही
प्लिज मला फक्त एकदा 

समजावून सांग,
मला तर बरोबरच वाटतय,
चूक की बरोबर एकदा ऊलगडून सांग...

                                                                                ---धनंजय लांब

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें