किती खरंय ना, मी पण कविता करायचो, करतोय, फरक एवढाचय की करायचो तेंव्हाची Intensity आणि कारणं आणि करतोय त्याची Intensity आणि कारणं...खूप फरकय यार, आताच्या कविता कामावरुन येता येता आठवतात आणि घरी येई पर्यंत विसरुन जातात, घरी आल्यावर त्यांचे तुकडे जोडताना मग ञासून जातो, काही वेळा तर जोडणंही सोडून देतो. करायचो त्या वेळेसच्या कविता बहुतेकदा लपून छपून लिहायचो तरीही उघड्या पडायच्या आताच्या कविता अनेकांना दाखवूनही वाचल्याच जात नाहीत.वेळ आणि परीस्थिती matters. कवितांमगच एक कारण माञ नक्की ते म्हणजे, inspiration, चैतन्य, कारण, मग त्याच स्वरुप कोणतही असू शकत. बहुतेकदा वयाबरोबर ते बदलत रहात. पण काॅलेज वयातील कवितांमागे 90+ % एकच inspiration, चैतन्य, कारण एक्कच असतं, ज्यांनी हे केलय त्यांना काय ते सांगायची गरज नाही.
कविता करायचो तेंव्हा लाडिवाळपणे फिरकी घेतली जायची, कविता करतोय तेंव्हा संशयाने फिरकी घेतली जाते. करायचो आणि करतोय या मधले फिरकी घेणारेही खूप बदललेत आता. यामुळेच की काय, करायचो तेंव्हा मन खूप हळवं होत, हळूहळू आता ते practical होत चाललय.
आणि Engineering Faculty मध्ये शिकत असतानाही कवितांचा छंद (हो छंदच) जोपासणे म्हणजे विरळच. पण हा वेगळेपणाच असतो जो अनेकांना भावतो, आपल्याला दुसर्यांपासून वेगळ बनतो.

---धनंजय लांब
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें