आज काॅलेजमधून निघताना गाडीच्या Odometer वर लक्षच ठेऊन होतो, कारणही तसच होत, 59992 km. Typical reading आली की फोटो काढून Computer वर mi bykes readingz या folder मध्ये टाकायची गाडी घेतल्यापासुनची सवय. अगदी 00000.0, पासून 00007.0, 00100.0, 00111.0, 00700.0, 00777.0, 01000.0......60000.0
काही readings सुटतात अनावधानाने किंवा वेळेअभावी पण काहीच.
काही readings सुटतात अनावधानाने किंवा वेळेअभावी पण काहीच.
काॅलेज मधून घाई नसते म्हणून आजची reading तर miss करायची नाही अस ठरवल. सारख लक्ष तिकडेच. 59996.0 पर्यंत लक्ष ठेवल. पण मग Traffic लागल, meter वरच लक्ष विचलीत...विसरुनच गेलो. थोड्या वेळाने गाडीने झटके द्यायला सुरवात केली, Reserve पण एवढी गर्दी की petrol cock सुद्धा वर करायला वेळ मिळाला नाही, तसाच clutch आणि accelerator चा combo, आणि भागो. गाडी आपोआप बंद पडायच्या आधी जागा बघून थांबलो, cock reserve वर करुन गाडी चालू करयचा प्रयत्न, एक kick, दोन, तीन,चार, पाच आणि सहा, पण no output. थांबलो. मग सातवी kick, गाडी start, head light ON, एकदमच reading च लक्षात आल,आणि reading 59999.8. Accelerator वाढवून number पुढे जातो का पाहिलं, पण तो .1 ने वाढून 59999.9 वर जाऊन थांबला. मग तसाच कडेकडेन गाडी चालवत 60000.0...अंधार पडलल्यामुळे फोटो नीट निघेना, फायबर ग्लासवर flash reflect होऊन नेमकं आकड्यांवर चमकायचा आणि फोटो बोंबलायचा. मग वेगवेगळे angles आणि settings, चौदा फोटो, पण एक काही मनासारखा येईना, तो पर्यंत रस्त्याने येणारे जाणारे भामट्या नजरेने बघतायत हे जाणवल, मग आता last try म्हणत म्हणत सहा फोटो काढले, अखेर सातवा फोटो मनासारखा आला.
गाडीचा हा typicalness मला जाम आवडतो (कधीकधी ञासही होतो). बहुतेक readings च्यावेळी गाडी reserve ला लागायची आणि सहजच meter कडे हटकून लक्ष जायच. पेट्रोल भरुन जरा जास्त दिवस झाले पण अजून कसकाय गाडी reserve ला लागली नाही म्हटल की थोड्याच वेळात reserve. गाडी घेऊन ईतके दिवस झाले पण अजून कुणाला धक्का नाही म्हणन आणि त्याच दिवशी railway station जवळ एकाला धडकनं, खूप दिवसांनी आतापर्यंत एकच सोडल धक्का नाही म्हणन आणि त्याच दिवशी पुन्हा तसच. याच जागेवर मागे गाडी reserve ला लागली होती म्हणन आणि लग्गेच गाडी भुरभूरणं, गडबडीत कितीही जोरात चालवली तरी safe निघन आणि निवांत चालताना परेशानी होण. ऐन गर्दीत डोळ्यात कचरा जाणं, ऐन भरात किडे शर्टमध्ये घुसन, असे कित्येक तरी...असो...
reading पाहून मन गाडी घेतली त्या दिवसापर्यंत मागे घेऊन गेलं. पण लगेच वर्तमान काळात येत गाडी सुरु केली. ऊगीचच comparison सूरु झालं, जाणवलं, की गाडी आता तेवढा pickup नाही घेतय, average पण थोड down झालय पण तशी अडखळतही नाहीये. मग गाडी चालवतानाचा रोजचा ऊपक्रम, link ups...
Birthday ची पण आपण अशीच अतुरतेने वाट बघतो, गद्धेपंचविशीपर्यंत कुणी किती वर्षाचा झालास विचारल्यास तेवढ्याच आनंदाने सांगतो. नंतरही सांगतो, पण वय वाढल्याची जाणिव व्हायला सुरुवात होते. थकल्यानंतर मग ऊगीचच ऊमेदीचा काळ आठवायला सुरु होतो, केस गळायल्यावर ऊगीचच शिकत असतानाचे केसांचे लाड आणि अवतार आठवतात...
आधी, आत्ता recently बालदिना निमीत्त भरपूर messages वाचले, क्यूं हम ईतने बडे हो गये? पण personally मला तरी पुन्हा लहान होऊ वाटत नाही (तस ते शक्यही नाही म्हणा) पण ज्या stage मध्ये ती पुढ सरकू नये असही वाटत. सगळ कस moderate आहे ना...ना कम, ना जादा...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें