"प्रेम डायरी"
आज दुपारी माझ्या कॉलेजचा ज्युनियर घरी
आला होता.
त्याला LLM 1st year च्या नोट्स पाहिजे होत्या. खुप पाहील्या पण सापडल्या नाही..
हो पण नोट्स सापडताना 2007 ची डायरी सापडली. ति माझ्या मिञला त्याच्या प्रेयसीने लिहलेली होती.
अशा गोष्टी माझ्या रुममध्ये सापडणे काही नविन नव्हते.
कारण अगदी 8वी पासुन मला वेगळी रुम होती व रुमकडे येण्याचे तीन मार्ग
होते.[ या रुमच महत्व त्या वेळी इंजिनीयरला कळल असेल म्हणुनच त्याने तीन मार्ग ठेवले असतीत ] या मार्गाने रुम मध्ये काय काय आले हे देवच जाणे.
रुमचा वापर माझ्या पेक्षा माझ्या मिञानेच जास्त केला. त्यांची प्रेमपञे/ग्रींटीग/गिप्टस/फोटो हे सर्व काही माझ्याच रुम मध्ये असत.
नंतर नंतर दारु पिऊन टुल झाले कि माझी रुम.घरी वादविवाद झाले कि माझी रुम
उशिरा झाला कि माझी रुम.
शाळेतला असो वा कॉलेजचा मिञ कोणी एखादाच अपवाद असेल कि ज्याच्या काही अठवणी माझ्या रुमशी निगडीत नसतील.
गेल्या काही वर्षात हे प्रमाण कमी झालय तसं आधुन मधुन काहीतरी कुटाणा करुन येणारे बायकोला भांडुन येणारे चालुच असतात. पण माझी कधी तक्रार नव्हती आणि कधी नसणार.
राञभर त्यांच ऐकुन घ्याव लागते पण आता सवय झालीय...
चला मुद्यावर येऊ ति डायरी मि चाळली [वाचली नाही ] त्यात 1जाने ते 31 डिसेंबर 2007 तब्बल 365 पाने लिहले होते.
मिञाला मि फोन केला कि तुझी डायरी सापडली आहे ति घेऊन जा चक्क तो म्हणाला कि नदीत फेकुन दे.[नदी माझ्या घरापासुन 200 मिटरवर आहे ] मि आश्चर्यचकितच झालो. यालाच प्रेम म्हणतात का?
पण मि ती डायरी संभाळुन ठेवणार आहे.
मि कधीच कुणाच्या भावनांशी खेळलो नाही कारण मि भावनांच मोल जाणतो.
मग त्या भावना कागदावरच्या असल्या तरीही.....

---शिरीष गुजर
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें