आशिर्वाद!!! - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

01 नवंबर 2015

आशिर्वाद!!!

असाच एक दिवस
मनासारखा पार पडला 
जरा कुठे टेकतो तोच
देव उभा राहिला
म्हणाला केंव्हा पासून
लक्ष्य आहे तुझ्यावर
फार मेहनत घेतोस 
तू तुझ्या कामावर

मी आज तुझ्यावर प्रसन्न झालो आहे
बोल काय आशीर्वाद हवा आहे
देवाला म्हणाले काय ते समजुन
देऊन टाक
देव म्हणाला वेड्या
मनात असेल ते मागून टाक

विचार करून सांगेन म्हटल
तर त्याला घाई होती
दुसर्‍या दिवशी बोलावून येईल
याची खात्री नव्हती

विचार केला आणि म्हटले
एक blank आशीर्वाद दे
जेंव्हा ईच्छा होईल तेंव्हा
कॅश करायची सोय करून दे

तेंव्हा पासुन खिशात एक
कोरा आशीर्वाद घेऊन फिरतो आहे
सगळं व्यवस्थित दिलंय देवाने
आणखी काय मागू विचार करत  आहे....

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें