ऐ, ही गोष्ट पटतेय का? खरं खरं सांग, Generally आपलेच प्रश्न आणि ऊत्तरही असतात ना. आपण एखाद्याला काही बोलायच्या आधीच त्याचे ऊत्तरही ग्रहीत धरतो. तसं पाहिल तर हा साधारण माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे. पण न्यूनगंडातून एखाद्याला बोलणं आणि त्यालाही हे अनपेक्षित असतं म्हणून आपल्याच बोलण्यातले Negative points पकडून त्याने ऊत्तर तयार करणं, ञासून मग आपण नेमक तेच सोडून दुसर बोललो असतो तर हे सगळ झालंच नसत याचा साक्षात्कार होण आणि हाताश होऊन बसणं. एखाद्याच ऊत्तर ग्रहित धरण खरंच खुप घातक असत. मिञाबरोबर झालेला Recent किस्सा, (sorry यार तुला नव्हतं घ्यायच यात, पण ओघान येणारच) आणि माझं झालेल mindriot, आणि माझ भडाभडा लिहीनंही मग सगळं सहजच आलं यार... आपल्याच प्रश्नापासून तयार झालेल्या ऊत्तरांमुळे झोपेच झालेल खोबरं, असंबद्ध बडबडण, Intensity प्रमाणं वहावत जाण, बोललं की लगेच चुक झालीये म्हणून ऊमजण पण तोपर्यंत वेळ हातातून निघून जाणं, त्यामुळं झालेली तणतण,भणभण, स्वत:वरच चिडणं, ञास करुन घेणं, वेळी पश्चातापाणं डोळे पाणावणं...खूपखूप गोष्टी असतात... अशाच mindsriot मुळे आलेली एक कविताय...
तू विसरून गेलास………
तू प्रेमात पडला आणि
माझ प्रेम बघायला विसरून गेलास,
तुझी प्रत्येक बडबड ऐकतेय पण
मला जे ऐकायचय ते सांगायला विसरून गेलास,
मी हो म्हणील कि नाही
याचा तू स्वतःच विचार करून गेलास,
फुलणाऱ्या माझ्या प्रेमावर
अशुभ विचार तू करून गेलास,
नुसतच बघितलं डोळ्यांमध्ये
प्रेम बघायचं विसरून गेलास,
सागायचं बरंच काही होत तुला
सागायचं तू विसरून गेलास,
विचारणार मी हि होते पण
अडवायचं तू विसरून गेलास...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें