खरंच किती खरंय ना !
कळत नकळत आपण बहुतेक वेळा डबल रोल मध्ये वागत असतोच,
घरचं टेन्शन बाहेर दाखवत नाही, बाहेरचं घरी…
मनाविरुद्ध काही झालं तरी बहुतेक वेळा आपलाआणि डबल रोल…
आवडत्या व्यक्तीसमोर न व्यक्त होण्याचा डबल रोल,
नावडत्या व्यक्तीसमोरही न व्यक्त होण्याचा…
कलीग्स समोर हि डबलच
मोठ्या सिनिअर्स समोर तर डबलच…
कित्येक म्हणून सांगू???
जे नसतात डबल रोल मध्ये त्यांना दुनिया फटकळ, मुर्ख वैगेरे विशेषण देतात,
असली विशेषण टाळण्यासाठी तरी घ्यावाच लागतो… डबल रोल !
मनुष्य जितक्या जास्त वेळा आणि जितक्या जास्त जणांसमोर डबल रोल करतो तितकाच तो चांगला आणि स्वार्थी असतो, चांगला कारण तो बरेच वेळा खर न बोलता कुणाला दुखावत नाही आणि हे सगळ तो चांगल भासण्यासाठी म्हणून स्वार्थीही.
मी म्हणतोय म्हणून नाही, बघा रात्री झोपताना विचार करून, पहा तुमची दुसरी बाजू, दुसरा रोल आठवतोय का? तुम्हीच ठरवा, सांगितलं नाही तरी चालेल…
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें