तुलाही नसेल वाटलं, मलाही नव्हतं वाटंत,
कधी हे असं होईल म्हणून ..
मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळत असेल घरावर,
आणि तुझी साधी आठवण देखील काढणं पाप वाटू लागेल मला.

पण पाप म्हणजे नक्की काय गं ?
पाप म्हणजे नक्की काय गं ?
पाप म्हणजे नक्की काय गं ?
आपण दोघांनी मिळून समुद्रकिनारी झेललेला तो पाऊस ?
मला शोधण्यात भरदुपारी तू केलेली ती वणवण ?
एका संध्याकाळी, मला फोनवर तू ऐकवलेलं ते सहेलारे ?

मी भुकेला असताना, करून घातलेला तो वरण-भात ?
...गुलजारची कविता थीएटर मध्ये पाहताना, आपल्याभोवती दाटलेला तो गुडूप अंधार ?

तुझं लग्न ठरलं तेंव्हा, आपण दोघांनी घेतलेलं आणि न चाखता तसंच वितळून गेलेलं ते आईस्क्रीम ?
तुझ्या लग्नाचं प्रेझेंट म्हणून, मी स्वतः शिवून दिलेली ती गोधडी ?

लग्नानंतर तू पहिल्यांदाच घरी आल्यावर, मला केलेला तो तिसरा फोन ?
तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल एक ही शब्द न बोलता,
सासरी पाळलेल्या कुत्र्याबद्दल बोलण्यात घातलेले ते तीन तास ?

की मला जागवणारा मध्यरात्रीचा हा तुझा आवडता पाऊस ?
आणि त्याचा हा घोंघावणारा आवाज..
तूच सांग पाप म्हणजे नक्की काय ?
आणि त्याचा हा घोंघावणारा आवाज..
तूच सांग पाप म्हणजे नक्की काय ?
तूच सांग पाप म्हणजे नक्की काय ?
म्हणजे पुण्य म्हणजे काय असतं हे मला कळेल.
म्हणजे पुण्य म्हणजे काय असतं हे मला कळेल.
तुलाही नसेल वाटलं, मलाही नव्हतं वाटंत,
कधीतरी मध्यरात्री मुसळधार पावसात मी चिंब भिजत असेन,
आणि तू मात्र कुठल्यातरी तळघरात गाढ झोपली असशील,
जिथे पावसाचा साधा पावसाचा आवाजही पोचत नाही कधी,
तुलाही नसेल वाटलं, मलाही नव्हतं वाटंत .....

Album: tarihi
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें