ना शब्द साथ देताहेत न् मन...मी तुझ्याचसारखा...
खूप दिवसांनी असा जागा मी आज, अशांत...
लाखो आठवणिंनी भारल्यासारखा...
माझ्या नकळत मनात काहूर का माजतं
अन् मी हताश त्या खूप दिवसांपुर्वी सारखा...

हट्ट विसरायला लावलास ना शब्दानेही न सांगता मला
बदलायलाही लावल्यास ना खूप गोष्टी, आधीच गबाळ्यासारखा...
नुसत्या कल्पनेनेच का एवढा ञास???
का मन व्याकुळ होतय अन् मी लहान मुलासारखा...

शब्द शब्द जुडून तुटताहेत आज कधी नव्हे ते
ऐ, सांग ना योग कधी जुळेल
त्या खुप पुर्वीच्या आधीच्या दिवसासारखा...
ऐ, सांग ना 'तू'झ्या शिवाय बंद होतील का कविता माझ्या???
फुलेल का गं विचारांचा मळा तुझ्या सुगंधी सहवासासारखा???
का झिजून जाईल विरहात ऊगळून मी रक्तचंदनासारखा???
का निशब्द होईल गं मी त्या हरवलेल्या अंधारासारखा???
ऐ, सांग ना कसं विसरु तुला कृतघ्नासारखा???

धनंजय...
#Mindsriot
#Mindsriot
20 मे 2016
12:06am
12:06am
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें